प्रशिक्षण योजना
प्रशिक्षण योजना राबविताना अवलंबविण्याची कार्यपद्धती
- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये विशेष घटक योजनेअंतर्गत प्रशिक्षण योजना राबविण्यात येत असून यामध्ये विविध कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत देण्यात येते. प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रति विद्यार्थी रु. 1,000 दरमहा एवढे विद्यावेतन देण्यात येते. तसेच प्रशिक्षण अभ्यासक्रमावर जास्तीत जास्त रु. 12,000/- पर्यंत प्रति विद्यार्थी प्रशिक्षण शुल्क महामंडळामार्फत अदा करण्यात येते. प्रशिक्षणाचा कालावधी किमान दोन महिने ते चार महिने या स्वरुपाचा असतो.
- महामंडळामार्फत सदर प्रशिक्षण योजना राबविताना पुढीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जदाराकडून घेतली जातात व त्यानुसार योग्य अर्जदारांची निवड प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमधून केली जाते.
सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याचे दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते. साधारणपणे प्रशिक्षण फी प्रति उमेदवार व्यवसायाच्या स्वरुपानुसार ठरविण्यात येते. प्रामुख्याने खालील व्यवसायाकरिता प्रशिक्षण देण्यात येते. उदा. वाहनचालक, टी.व्ही.व्हीडीओ, रेडीओ दुरुस्ती, टेलरिंग, वेल्डींग, फिटर, संगणक, ई-मेल व विविध व्यवसायनुरुप प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना दरमहा रु. 1,000/- विद्यावेतन देण्यात येते. तसेच महामंडळामार्फत प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण फी दिली जात
अ. कर्ज मंजूरीकरिता आवश्यक कागदपत्रे
अ | कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता आवश्यक कागदपत्रे |
---|---|
1 | जातीचा दाखला |
2 | उत्पन्नाचा दाखला |
3 | रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी) |
ब | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते |
1 | प्रशिक्षणास इच्छुक अर्जदाराकडून जिल्हा कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येतात. |
2 | जिल्हा कार्यालयामार्फत पात्र अर्जदारास प्रत्यक्ष मुलाखतीकरिता बोलावून मूळ कागदपत्रे तपासणीअंती निवड समिती पुढे प्रस्ताव ठेवण्यात येतो. |
3 | प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधून निवड झालेल्या अर्जदारांना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडे जिल्हा कार्यालयामार्फत प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येते. |
4 | प्रशिक्षण संस्थांकडून दरमहा प्राप्त होणाऱ्या हजेरी पत्रकानुसार प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन व प्रशिक्षण संस्थेस फी अदा करणेची कार्यवाही जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात येते. |